- जिवाची पर्वा न करता कोरोना बाधित झालेल्या भागात औषध फवारणी 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🌟💠🌟💠
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग हादरुन गेला आहे दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर,नर्स, आरोग्य कर्मचारी, पत्रकार,अंगणवाडी कर्मचारी ,आशा वर्कर्स असे अनेक जण या करीता लढा देत आहेत याचं अनुषंगाने पेण नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारीही उत्तम कामगिरी बजावत आहेत.
पेण शहरातील वाढते बाधित रुग्ण पाहता एखाद्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पाॅझिटीव्ह आल्याची माहिती प्रथम नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे येते त्यानुसार आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची कोणतीही पर्वा न करता तो कर्मचारी बाधित रुग्णाच्या विभागात जाऊन औषध फवारणी करतो आणि तेथील कोरोना डब्बे जमा करुन त्याची विल्हेवाट सुद्धा लावतो यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल समाजामध्ये त्यांचे कौतुक होत आहे. कोरोनाच्या या लढाईमध्ये खरे कोरोना योद्धे हे नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारीच आहेत.

त्यामुळे पेण नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण, औषध फवारणी मुकादम उत्तम कांबळे, ड्रायव्हर रमेश सोनावणे, भरत भोईर, किरण पाटील, सतिराज, कर्मचारी सागर मोरे,जयेश जाधव, गजानन कांबळे, संतोष दाभाडे, जनार्दन भालेराव, राजेंद्र भोईर आदि नगरपालिका कर्मचारी या मध्ये उत्तम कामगिरी बजावत आहेत.






Be First to Comment