Press "Enter" to skip to content

नवी मुंबई, पनवेल येथील नागरिकांना आरोग्य तपासणीमध्ये 30% सवलत


सिटी बेल लाइव्ह / नवी मुंबई/ ठाणे 🔶🔷🔶🔷

कोरोना संकटकाळामध्ये मार्च महिन्यापासून अनेक नागरिक मुख्यतः जेष्ठ नागरिक हे नियमित आरोग्य तपासणीपासून दूर आहेत. कारण अनेक हॉस्पिटल हे कोव्हीड सेन्टर म्हणून घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्रात आता अनेक शहरांमध्ये राज्य सरकारतर्फे मिशन बिगिन अगेन म्हणजेच अनलॉकची प्रक्रिया संपूर्ण वैद्यकीय काळजी घेऊन सुरु करण्यात आली आहे, व याच निमित्ताने नवी मुंबईतील नागरिकांना कळंबोली येथील सुअस्थ हॉस्पिटलमध्ये २ सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वैद्यकीय आरोग्य तपासणीवर ३० टक्क्याची सूट देण्यात येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सुअस्थ हॉस्पिटलच्या अधिकृत प्रवक्त्या डॉ. वनिता मांडे म्हणाल्या, ” सध्या पावसाळी वातावरण असून अनेक नागरिकांना साथीच्या रोगांची लागण होत आहे. कोरोनाशी आपल्याला लढायचे आहेच परंतु इतर आजारांचे निदान होणे फार गरजेचे आहे, अनेक नागरिक कोरोनाच्या भीतीने हॉस्पिटलमध्ये येण्यास घाबरतात यासाठी सुअस्थ हॉस्पिटलने पनवेल महानगर पालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नॉन कोव्हीड रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार व निकासीत दाराची व्यवस्था केली आहे. त्यासोबतच नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्व दिले असून या क्षेत्रामध्ये नियमित स्वछता व निर्जतुकीकरण, पीपीई किट्स, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियमीत तपासणी होत आहे. कोरोनाच्या काळात अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या असून उदयॊगधंद्यांचेसुद्धा नुकसान झाले आहे व याचे भान राखून आम्ही सर्व वैद्यकीय आरोग्य तपासणीवर ३० टक्के सवलत देत आहोत.

डॉ. कनोरिया इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स होलिस्टिक हेल्थकेअरच्या सहकार्याने सुअस्थ हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नवी-मुंबई, पनवेल व रायगड जिल्ह्यातील रहिवाश्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाचे आरोग्य सेवा प्रदान करत आहेत, त्यासोबतच आम्ही कोव्हीड रुग्णांसाठी एक स्वत्रंत वॉर्ड तयार केला असून पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना याचा लाभ होत आहे.” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवन शैलीमध्ये अचानक झालेला बदल किंवा उत्पनाच्या अनिश्चिततेमुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे;लॉकडाउनमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे परंतु किडनी, हृदयविकार व इतर गंभीर आजारावर दुर्लक्ष झाले आहेत तसेच साथीच्या आजारांचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमित आरोग्य तपासणी करणे महत्वाचे आहे अशी माहिती सुअस्थ हॉस्पिटलतर्फे देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.