शिवसेना शहर प्रमुख प्रदीप (दादू) गोळे यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर त्यादृष्टीने आवश्यक त्या प्रभावी उपाययोजना व आरोग्य सुविधा देखील राबविण्याची गरज आहे. सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड टेस्ट करण्यासाठी इतर तालुक्यात जावे लागत आहे. परिणामी त्यांची प्रचंड गैरसोय व परवड होते. मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालीत कोविड-19 ची टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी शिवसेना पाली शहर प्रमुख प्रदीप (दादू) गोळे यांनी केली आहे.
तालुक्यातच टेस्टची सुविधा झाल्याने कोरोना आटोक्यात यायला मदत होईल. रुग्णांना वेळेवर योग्य उपचार देखील घेता येतील. तसेच त्यांचे श्रम व पैसा वाचेल आणि आणखी कोणाला संसर्ग देखील होणार नाही असे प्रदीप गोळे यांनी सांगितले.






Be First to Comment