चंदरगावातील असंख्य तरुणांचा मनसेत जाहीर पक्ष प्रवेश 💠🌟💠🌟
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🔷🔶🔶🔷
सुधागड तालुक्यात मनसेला अच्छे दिन आले आहेत. झाप येथील असंख्य तरुणांच्या पक्ष प्रवेशानंतर चंदरगाव ग्रामपंचायत मधिल चव्हाणवाडी येथील असंख्य तरुणांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवुन जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे यांच्या उपस्थितीत विभाग अध्यक्ष केवळ चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य मिलींद शेळके यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सुनिल साठे यांनी प्रवेशकर्त्यांचे जोरदार स्वागत केले.

सुधागड तालुक्यात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेला संघटनात्मक दृष्ट्या अधिकाधिक मजबूत व बळकट करण्यासाठी तालुकाध्यक्ष सुनिल साठे व सर्वच पदाधिकारी मनसे कामाला लागले आहेत. तालुक्यात गाव तिथे शाखा या उपक्रमाला सर्वत्र प्रतिसाद व वाढता पाठिंबा मिळत आहे. यावेळी सुनिल साठे म्हणाले की महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व परिवर्तनाचा ध्यास घेऊन राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने राजसाहेब काम व योग्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या संकल्पनेतील उज्वल भवितव्य असलेला महाराष्ट्र्र उभा राहण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे.
आज तरुण मोठ्या संख्येने पक्षात सहभागी होत असल्याने पक्षाला उभारी मिळत आहे. सुधागड तालुक्यात गाव खेड्यापाड्यातील जनतेच्या समस्या व प्रश्न पोटतिडकीने सोडविण्यावर मनसे भर देत असल्याने पक्षाचा आवाका व जनाधार वाढत असल्याचे तालुकाध्यक्ष साठे म्हणाले.

सुधागडसह जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोरोनाच्या राष्ट्रीय संकटात गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात व आधार दिला. तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही आपला जीव धोक्यात घालून जनहिताच्या कामांवर भर दिला. त्यामुळे सामाजिक बांधिलकी व सेवाभाव जपणाऱ्या मनसेकडे येथील तरुण वर्ग आकर्षित होताना दिसत आहे.
राजसाहेब ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्यातील प्रमुख व वरिष्ट पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
येत्या काळात पक्षाची ध्येयधोरणे व उध्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या अधिक बलाढ्य बनविण्यासाठी तनमनधनाने योगदान देणार असल्याची ग्वाही यावेळी प्रवेशकर्त्या तरुणांनी दिली.






Be First to Comment