Press "Enter" to skip to content

महानगर गॅस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔷🔶🔷🔶

कोरोनामुळे संपूर्ण शिक्षण लाॅकडाऊन झाले आहे त्यामुळे या दरम्यान मुंबई महानगर गॅस लिमिटेड आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पेण तालुक्यामधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पद्धतीचे मार्गदर्शन केले जात आहे.

पेण तालुक्यातील 25 गावामधील मुलांना दररोज भाषा, गणित, विज्ञान विषयाचा त्याचबरोबर एक दिवस आड “करोना थोडी मस्ती थोडी पढाई” असा संदेश देणारा अभ्यास तसेच पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना पालकांच्या मोबाईल व्हॉट्सअप , एसएमएस या माध्यमातून पाठविला जात आहे. मुलांना स्वयंम शिक्षणाची सवय लागावी तसेच पालकांच्या मदतीने मुलांच्या शिक्षणात सातत्य टिकून राहावे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी गेल्या एक वर्षापासून प्रथम अंतर्गत “आमचे गाव”हे कार्यक्रम सुध्दा राबवत आहेत.त्यामुळे या मार्गदर्शची मुलांना सवय होऊन त्यांच्या शैक्षणिक गुणांमध्ये वाढ होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.