Press "Enter" to skip to content

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे पनवेल तहसिल कार्यालयात निषेध आंदोलन

सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🔶🔷🔷🔶


धुळे इथे अभाविप च्या कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थीतीत आणि उत्तर जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या वेळी पालक मंत्री अब्दुल सत्तर यांच्या असंवेदनशील वागणुकीचा आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रात शिक्षणाचा जो खेळ खंडोबा करून ठेवला आहे या दोन्ही गोष्टींचा निषेध करण्यात आला.

या वेळी ५ प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
१) कोरोनामुळे सध्या जनतेची हालाकीची परिस्थिती असताना चालू शैक्षणिक वर्षाच्या शुल्का मध्ये ३०% कपात करण्यात यावी.

२) मागील शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या,त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे परीक्षा शुल्क भरले होते ते परत करणे.

३) मागील शैक्षणिक वर्षाच्या सरासरी गुणानवरून जो निकाल लावण्यात आला आहे त्यात अनेक विद्यार्थ्यांच्या वर अन्याय झाला आहे,ज्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे त्यांचा सहानभूतीने विचार करावा.

४) धुळे येथील अभाविप च्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांच्या कडून अमानुष मारहाण होत असताना हस्तक्षेप न करणारे पालकमंत्री श्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी.

५) महाराष्ट्रात शैक्षणिक खेळ खंडोबा घालून,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी.
वरील सर्व मागण्यांचे पत्र तहसीलदार श्री अमित सानप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी सदस्य प्रशांत कदम,युवा मोर्चा अध्यक्ष कामोठे हर्षवर्धन पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष खारघर विनोद घरत,पनवेल ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रोहित जगताप यांच्या सह मोठ्या संख्येने युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.