Press "Enter" to skip to content

उरण शहरात १३ अतिधोकादायक इमारती


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

उरण नगरपालिका हद्दीतील एकूण १३ इमारती अतिधोकादायक असून त्यांना गेल्यावर्षीच म्हणजे २०१९ मध्येच नोटीस दिली. त्यानंतर कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधिकारी अनुपकुमार कांबळे व झुंबर माने यांनी दिली.

तीन-चार दिवसांपूर्वी महाड येथील ५ मजली इमारत पत्यासारखी कोसळून त्यामध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर शासकीय प्रशासन खडबडून जागे होत त्यांनी कडक कारवाईचे संकेत देत धोकादायक इमारतींची माहिती घेतली जात आहे.

उरण नगरपालिकेने केलेल्या सर्व्हेनुसार ११ इमारती अतिधोकादायक तर १ धोकादायक असून १ इमारत पाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शहरात आधीच वाढते अतिक्रमण आणि बांधकामा बाबत बेजबाबदारपणा हे गणित जुळलेले असतानाच शहरातील अतिधोकादायक टाऊन हॉलच्या समोर उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी अधिकारी कार्यालय, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तलाठी व वनविभाग कार्यालय, गणपती चौक येथे शांतीलाल हिराचंद जैन व विश्वास जयंतीलाल जैन यांच्या मालकीची येथे फक्त दुकानाचा वापर चालू, उरण बाजारपेठ मदन दामू कोळी व इतर शांतिनिवास वास्तव्य नाही, वाणीआली मयूर हरीलाल मेहता व इतर यांच्या मालकीची एकच कुटुंब रहाते, वाणीआली विजया जयेशकुमार मेहता दवाखाना सुरू, मोरा गंगुबाई सीताराम कोळी रहिवाशी नाहीत, मोरा मोतूबाई बा. कोळी व पद्मिबाई लक्ष्मण कोळी रहिवासी वापर सुरू, मोरा वत्सला रामचंद्र कोळी रहिवासी व गाळा वापर, मोरा अर्जुन हाल्या कोळी रहिवासी नाहीत, बुरुडआळी बानूबाई अफलातून आताई व इतर पोस्ट ऑफिस कार्यालय रहिवासी वापर सुरू, धोकादायक मोरा जनार्दन नारायण कोळी रहिवासी वापर सुरु, तर मोरा येथील सुक्या आयक्या कोळी यांनी बांधकाम जमीनदोस्त केले आहे.

महत्वाचे म्हणजे उरण पालिकेने या इमारत धारकांना तशा प्रकारची नोटीस देऊनही इमारत धारकांनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा दुरुस्ती अथवा इमारत पुन्हा बांधण्यासाठी अर्ज पालिकेकडे केला नसल्याचे समजते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.