प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांची महापालिकेकडे आदेश जारी करण्याची मागणी 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / खांदा कॉलनी 🌟💠🌟💠
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील काही सोसायटीमध्ये शासन नियमांना बगल देत सोसायटी पदाधिकारी स्वयंघोषित नियम बनवून घरकाम करणारे मोलकरीण वर्ग व घराघरांतून कचरा गोळा करून इमारतीचा पॅसेज साफ करणारे झाडूवाले यांना सोसायटी आवारात प्रवेश नाकारत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून सदर तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कामगारांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण सोसायटींमध्ये घरकाम करणारे व झाडूवाले यांना प्रतिबंध न करता प्रवेश देण्यात यावा याबाबतचा आदेश जारी करण्यात यावा याकरीता पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी निवेदन ई – मेल द्वारे दिले.
सदर आदेश तातडीने जाहीर करून घरकाम करणारे व झाडूवाले या हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गास दिलासा देण्याची विनंती भोपी यांनी केली.







Be First to Comment