Press "Enter" to skip to content

गुळवेल : रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे उत्तम औषध

सिटी बेल लाईव्ह : आरोग्य कट्टा 🔶🔷🔶🔷

आजच्या काळात बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे होणाऱ्या संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अबाधित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपण हल्ली अनेक उपाय करत असली तरी सर्वात गुणधर्मांनी भरलेली औषधी म्हजणे गुळवेल. याला गिलोय देखील म्हणतात. याचे सेवन केल्याने प्रतिकारकशक्ती वाढते. . तर चला याचे फायदे जाणून घ्या आणि कशा प्रकारे याचे सेवन करावे हे देखील वाचा…

पाचक शक्ती वाढवते

बद्धकोष्ठता दूर करते

शरीरास हानी करणारे बॅक्टेरिया आणि संक्रमण काढून टाकण्यास प्रभावी

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करते

श्वासासंबंधी समस्यांवर फायदेशीर

मानसिक तणावातून मुक्त

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते

स्मरणशक्ती वाढते

डोळ्यातील कमकुवतपणा दूर करण्यास फायदेशीर

पोटातील कृमीकीटक यांचा नाश करते

लठ्ठपणाची समस्या दूर होते

डेंग्यूमध्ये गिलोयचा रस अत्यंत फायदेशीर

अशक्तपणा दूर होतो.

बर्‍याच दिवसांपासून ताप येत असेल आणि तापाचे प्रमाण कमी होत नसेल तर गुळवेलीचा काढा पिणे फायदेशीर ठरेल.


रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुळवेलीची मुळी आणि बेलाचे पान पाण्यात उकळून दिवसातून दोनदा हा तयार केलेला रस 1-1 चमचा घ्यावा.

डोळ्यांच्या आरोग्यसाठी आवळाचा रस यांच्या रसात प्यावा.

चरबी कमी करण्यासाठी गुळवेलीच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यावा.

आपण घरी गुळवेल काढा बनवू शकता

यासाठी गुळवेली चं वेली घेऊन त्याचे लहान तुकडे करा. आता सोलून घ्या आणि त्यावरील थर काढा. हे तुकडे एका ग्लास पाण्यात मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि तयार मिश्रण गाळून दिवसातून दोनदा घेऊ शकता. किंवा बाजारात तयार गिलोय रस किंवा गिलोय वटी देखील मिळते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.