सिटी बेल लाइव्ह / रामचंद्र घोडमोडे / श्रीवर्धन 🔶🔷🔷🔶
पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गौरी गणपतींना निरोप देण्यात आला. गुरवारी दुपार नंतर गणपती विसर्जनाला सुरवात झाली. देशावर व राज्यात कोरोना सारख्या महाभंयकर रोगाचे सावट आसताना शासनाने नीर्गमीत केलेल्या अटी व शर्तीचे पालन करत कोणतेही वाद्य, मिरवणूक तसेच गुलालाची उधळण न करता विसर्जन करण्यात आले. भजन न करता विसर्जन करणे ही पहिलीच वेळ होती.

श्रीवर्धन मध्ये घरगुती गणपतींची संख्या भरपूर प्रमाणात असते. शेवटची मंगल आरती आटोपून बप्पाला साश्रू नयनांनी निरोप देन्यात आला.विसर्जन सोहळा निर्विँध्न पार पाडण्यासाठी रस्ते व समुद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. समुद्रा वर विसर्जन स्थळां ठिकाणी उतरण्यासाठीअसलेले रेम्प तसेच रेस्टहाऊस, मठाचा गवंड, जीवना कोळीवाडा येथील रस्ते रेम्प नगरपालिकेकडून दुरुस्ती करून सज्ज करण्यात आले होते.

नगरपालिकेचे कर्मचारी निर्माल्य ठरऊन दिलेल्या जागी ठेवण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे दिसुन येत होते. शहरातील मेटकर्नी बाजार पेठ, गणेश आळी, केळस्कर पाखाडी, दांडा, भैरव नाथ पाखाडी, जीवनेश्वर गुरव आळी, गोठन, जीवनेश्वर कोंड, महेश्वरआळी सर्व शहर वासीयांकडून घरगुती गौरी व गणरायाला गोड पदार्थांचा नैवदय असलेली शिदोरी बांधुन गौरी गणपती बरोबर विसर्जन करण्यात आले.






Be First to Comment