सिटी बेल लाइव्ह / उरण / घनश्याम कडू यांचा 🔶🔷🔷🔶
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती दूर करण्यासाठी कोरोना पॉझिटीव्हचा रुग्ण बरा झाल्या नंतर आणखीन रुग्णांना बरे करता येऊ शकते. यासाठी अशा बाधीत झालेल्या रुग्णांनीप्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी केले आहे.
कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून अन्य चार बाधीत रुग्णांना बरे करता येऊ शकते. ज्या रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असेल असा रुग्ण बरा होतो. तेव्हा त्या रुग्णाच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठी प्रति अँटीबॉडीज तयार होत असतात. या आधारावर प्लाझ्मा थेरपी सिस्टम काम करीत आहे.यामुळे कोरोनातून बरा झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान केल्यास त्याचा फायदा इतर रुग्णांना होऊ शकतो. यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोपाळ पाटील यांनी केले आहे.
यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे नागरिकांना कोरोना टेस्टबाबत संशय निर्माण झाला आहे. यामुळे प्लाझ्मा दान केल्यास टेस्ट बाबत असणाऱ्या शंकांचं नक्कीच निरसन होईल असं उरण उत्कर्ष समितीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तर कोरोना टेस्ट रिपोर्ट खोटे देण्यात आले असल्यास समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल असे समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सांगितले आहे.
प्लाझ्मा दान करण्याविषयी उरणमधील शासकीय यंत्रणेच्या अधिकारी वर्गाकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांना यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे तसेच सदरची प्रक्रिया कुठे व कुठल्या हॉस्पिटलमध्ये होते याची विचारणा केली असता त्यांनी आम्हांला काहीच माहिती नसून माहिती घेऊन कळवितो असे उत्तर दिले. परंतु त्याला १० ते १२ दिवसांचा अवधी उलटूनही ते माहिती देऊ शकले नाहीत. यावरून येथील शासकीय प्रशासन किती सुस्त आहे हे उघड होत आहे. तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी उरणमधील पत्रकारांनी केली आहे. उरणमधील अनेक कोरोनामुक्त प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यांची तालुका पातळीवर नोंदणी करणारे रजिस्टर व सदरचे हॉस्पिटल कुठल्या भागात आहे. याची माहिती देणारी यंत्रणा सज्ज करण्यात यावी.






Be First to Comment