सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह १४ जण सापडले आहेत. १२ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर १ कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण पॉझिटीव्ह १३०९, उपचार करून बरे झालेले १०७४, उपचार घेणारे १७५, मयत ६३ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज सीआयएसएफ कॉलनी चारफाटा उरण १, उरण १, धुतुम १, कामठा उरण (एकदंत बिल्डिंग) १, चिरले २, कोटनाका १, महालक्ष्मी अपार्टमेंट उरण ३, डोंगरी १, विंधणे १, नवे पोपूड म्हातवली १, पाणजे १ असे एकूण एकूण १४ पॉझिटीव्ह सापडले आहेत. साई अपार्टमेंट आंदनगर १, करंजा १, बोरी पाखाडी १, नवघर १, जसखार १, जेएनपीटी टाऊनशीप २, बौद्धवाडा उरण १, बांधीलवाडी केगाव १, वैभवलक्ष्मी अपार्टमेंट उरण १, आवरे १, कामठा पंचवटी १ असे एकूण १२ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले. तर पाणजे येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बाजारात खरेदी करताना सावधानता पाळणे गरजेचे आहे.






Be First to Comment