Press "Enter" to skip to content

सुधागडात आटपेना कोराना संसर्गाची  साथ !

नव्याने आढळले रूग्ण सात ! एकाचा मृत्यू : एकूण बाधित 150 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠

सुधागडसह जिल्ह्यात कोरोना अधिक च फोफावत असल्याचे दिसते.सुधागड तालुक्यात दररोज रूग्ण संख्येत भर पडत आहे.  तालुक्यात बुधवारी सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार नव्याने 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.  सुधागड तालुक्यात कोरोना संसर्गाची साथ आटपत नसल्याने चिंता वाढली आहे.

     तालुक्यात आता कोरोनाचे एकूण 150 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत कोरोनाचे 101 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि 43 जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरवातीपासून प्रशासन योग्य प्रकारे काम करत आहे. नागरिकांनी शासन   नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, नागरिकांनी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे  असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.