Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांचे प्रश्नांसाठी बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक…!

शासन नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी उकळणाऱ्या शिक्षण संस्थांवर कडक  कारवाई करा : प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी 🔶🔷🔶🔷

पालीतील ग. बा. वडेर हायस्कुल समोर आमरण उपोषण सुरू 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟

संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आहे, सर्वसामान्य गोरगरीब, हातावर पोट असलेल्या घटकांची अवस्था तर अत्यंत बिकट झाली आहे. अशातच काही शिक्षण संस्था सामाजिक भान न राखता आवाच्या सव्वा फी आकारत आहेत. शासन नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी उकळणाऱ्या शिक्षण संस्थांवर कडक  कारवाई करा अशी जोरदार मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी पालीतील आंदोलनादरम्यान केली आहे.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जातीतील विद्यार्थ्यांची प्रवेश फी माफ करावी, इयत्ता अकरावीची प्रवेश फी शासन नियमांनुसार घ्यावी, विनाअनुदानित तुकड्यांची फी निश्चित करावी अशा विविध मागण्या बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी येथील ग. बा. वडेर हायस्कुलच्या गेट समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. 

       या आंदोलनास सुधागड तालुका सम्यक विद्यार्थी आंदोलनाने देखील साथ दिली. कोरोना महामारीच्या संकटाने अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगार गेलेला असून त्यांना पैशांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत एकही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये. तसेच विद्यार्थ्यांना अनुदानित तुकडीतच प्रवेश द्यावा अशी देखील मागणी बहुजन विद्यार्थी संघटना व सम्यक विद्यार्थी आंदोलन ने केली आहे. 

     या बाबत रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब थोरात यांनी संबंधितांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी केली आहे. गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही कायम भक्कमपणे उभे राहू असे देखील वाणी यांनी आश्वाशीत केले. यावेळी संघटनेचे  कार्याध्यक्ष अमित गायकवाड म्हणाले की सु.ए. सो. या संस्थेकडून नियमांचे उल्लंघन करून अव्वाच्या सव्वा प्रवेश फी जमा केली जात असून याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी अमित गायकवाड, सुशील गायकवाड व स्वप्निल गायकवाड हे पदाधिकारी उपोषणास बसले आहेत.

उपोषणावेळी बहुजन विद्यार्थी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी, रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष निशांत पवार, कार्याध्यक्ष अमित गायकवाड, तालुकाध्यक्ष सुशील गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुका अध्यक्ष स्वप्निल गायकवाड, उपाध्यक्ष निलेश जाधव, सिद्धांत साळुंखे, तालुका सचिव प्रशांत जाधव, तालुका सहसचिव रोहित भालेराव, अमित जाधव, समीर जाधव, सुनील दुमणे, सुमित गायकवाड, अनिकेत मोहिते, वैभव जाधव, संकेत पवार, पियुष जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.