कोरोनामुळे जीव गमावलेल्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम त्वरित द्यावी – जिल्हा परिषद सदस्या कुंदा ठाकूर यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
कोरोनाच्या महामारीत भल्याभल्यांची भंबेरी उडत असताना आशा वर्कर व अंगणवाडी सेविका जीवावर उदार होऊन तळागाळात जाऊन कोरोनाची तपासणी करण्याचे काम जीवावर उदार होऊन करीत होते. हे काम करीत असताना काही भगिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यांनी जीव गमावला त्यांचा शासनाने पुरस्कार देऊन गौरव केला हे चांगले झाले. परंतु ज्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचा जीव गेल्यानंतर त्यांचे कुटूंब उघड्यावर आले आहेत. तरी त्यांचा या गौरवा बरोबर जी विमा रक्कम ठरली आहे, ती महिना भरात कुटुंबाच्या हातात मिळावी अशी मागणी जिप सदस्या कुंदा ठाकूर यांनी केली आहे.
देशात व राज्यात कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्यांचावर जबाबदारी आहे असे अधिकारी वर्ग ही गावोगावी तपासणी करण्यासाठी कचरत आहेत. मात्र ही जबाबदारी अल्प वेतनात काम करणाऱ्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी न घाबरता प्रत्येक घराघरात जाऊन कोरोना कोणाला झाला आहे की नाही याची तपासणी करण्याचे काम करीत आहेत. यासाठी कोरोना पासून सुरक्ष घेण्याचे साहित्य ही त्यांना स्वतःच्या खर्चातुन खरेदी करावे लागले. तरीसुद्धा त्या मोठ्या हिंमतीने आपले कर्तव्य बजावीत होते.
हे कर्तव्य बजावीत असताना काही आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाची बाधा झालेल्या या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांची उपचारासाठी त्यांना वणवण फिरावे लागले. त्यामध्ये काहींचा मृत्यू झाला आहे. यापुढे कोरोनाने बाधित झालेल्यांना त्वरित उपचार मिळावेत. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवत विमा कवच जाहीर केले आहे.
त्याबद्दल शासनाचे आभार मानले जात आहे. परंतु ज्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा कोरोनामध्ये आपले कर्तव्य बजावीत असताना मृत्यूला कवटाळले आहे.यासाठी शासनाने ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेकडे सन्मानचिन्ह वर्ग केले त्याप्रमाणेच विमा रक्कम ही वर्ग करावी. यासाठी त्यांना बारा हेलपाटे मारावे लागू नये. तसेच अंगणवाडी सेविकांना मध्यंतरी काम थाबविण्यास सांगितले होते. मात्र काहींना कोरोनाची बाधा झाली होती. तरी असा अन्याय होता कामा नये.
ज्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा कोरोनाने मृत्यू झाला असेल तर त्यांना सन्मानचिन्हा बरोबरच त्यांच्या कुटुंबाना काही दिवसांच्या आत विमा कवचाची असलेली रक्कम मिळाली तर त्याचा फायदा होईल.
शासनाने याचा सारासार विचार करून अल्पावधी पगारात काम करणाऱ्या आशा वर्कर व अंगणवाडी सेविकामधील ज्यांचा कोरोनात कर्तव्य करीत असताना मृत्यू झाला त्यांची विमा रक्कम महिनाभरात मिळावी अशी मागणी जिप सदस्या कुंदा ठाकूर यांनी केली आहे.






Be First to Comment