Press "Enter" to skip to content

सुधागड तालुक्यात मनसेचा गड होतोय भक्कम ! 



झाप गावातील अनेक तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश, सुनिल साठेंकडून पक्षात स्वागत 🔶🔷🔶🔷 


सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠

सुधागड तालुक्यात मनसेचा गड संघटनात्मक दृष्ट्या दिवसेंदिवस भक्कम होताना दिसतोय. पालीनजीक असलेल्या झाप गावातील अनेक तरुणांनी बुधवारी (दि.26) मनसेचा झेंडा खांद्यावर घेत मनसेत जाहीर प्रवेश केला.

राजसाहेब ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्यातील प्रमुख व वरिष्ट पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली, सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे व विभाग अध्यक्ष केवल चव्हाण यांच्या उपस्थितीत या तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.

गाव तिथे मनसेची शाखा स्थापन करण्याचा निर्धार यावेळी तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी व्यक्त केला. सुधागड तालुक्यात मनसे अधिक बळकट करण्यासाठी व पक्षाचा आवाका वाढविण्यासाठी  पदाधिकारी जीवाचे रान करीत आहेत.  अशातच राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत तरुण मनसेला अधिक  पसंती देताना दिसत आहेत. मनसे पक्षाचे कार्यकर्ते जनतेला भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्यावर भर देत आहेत. 

जनतेत मिसळून काम करीत आहेत.  त्यामुळे मनसे पक्ष तालुक्यात उभारी घेताना दिसतोय.  सुधागड तालुक्यात मनसे अधिक बळकट करण्यासाठी व पक्षाचा आवाका वाढविण्यासाठी पदाधिकारी जीवाचे रान करीत आहेत.  त्यामुळे मनसे पक्ष जनमाणसाच्या मनावर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरत आहे.

तळागाळात पोहचून जनहिताच्या प्रश्नावर झपाटून काम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते पाहता आगामी निवडणुकात मनसे आपली किमया दाखवेल असे संकेत मिळत आहेत. 

यावेळी मनसैनीक विनय सितापराव व त्यांच्या सहकार्यानी विशेष मेहनत घेतली. विकास कामे व जनतेच्या समस्या सोडविण्याबरोबरच राज ठाकरे यांचे विचार प्रत्येक गावागावात, खेड्यापाड्यात  पोहचविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगत येत्या काळात मनसे पक्षसंघटना 

पक्षाची ध्येयधोरणे व उध्दीष्टे डोळ्यासमोर ठेवून पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या अधिक बलाढ्य बनविण्यासाठी तनमनधनाने योगदान देणार असल्याची ग्वाही यावेळी प्रवेशकर्त्या तरुणांनी दिली. 

 


सुधागड तालुक्यातील झाप येथील तरुणांचे मनसे पक्षात स्वागत करतांना तालुकाध्यक्ष सुनील साठे व केवळ चव्हाण.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.