Press "Enter" to skip to content

सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याची शिवसेनेची मागणी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) 🔶🔷🔶🔷

प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सिडकोने सोडवाव्यात अशी मागणी आज  सिडकोचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी ह्यांची रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व प्रकल्पग्रस्तांचे नेते बबनदादा पाटील यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत व राष्ट्रवादीचे नेते सुदाम पाटील यांनी भेट घेवून करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. मुखर्जी ह्यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. व लवकरच प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्याची विनंती जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी यावेळी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.