सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह फक्त २ जण सापडले आहेत. तर १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
आज एकूण पॉझिटीव्ह १२५४, उपचार करून बरे झालेले १०३५, उपचार घेणारे १६२, मयत ५७ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज नागाव १ व भेंडखळ १ असे फक्त २ जणच पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर मुळेखंड १, जेएनपीटी ३, पाले १, दिघोडे १, बोरी १, रांजणपाडा चिरनेर १, जासई १, पागोटे १, करंजा नवापाडा १, उरण १, भेंडखळ २, उरण पोलीस स्टेशन १ असे एकूण १५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या आगमनानंतर कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी झाल्याचे दिसत असल्याने गणेशभक्तांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.






Be First to Comment