सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔷🔶🔷
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे आज तांबडी – रोहा येथील पीडित मुलीवर झालेल्या अत्याचारा संदर्भात पिडित मुलीच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी जात असताना त्यांचे नागोठणे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकणनाका येथे जोरदार स्वागत केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रोहा तहसीलदार श्रीमती कविता जाधव हे उपस्थित होते.
वाकण नाक्यावर अनिल देशमुख यांच्या स्वागताला रोहा पं. स चे माजी सभापती सदानंद गायकर, नागोठणे शहर अध्यक्ष प्रकाशशेठ जैन, सुधाकर जवके, रोहा तालुका महिला अध्यक्षा सौ.अमिता शिंदे, युवक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, पिगोंडे सरपंच संतोष कोळी, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य सदस्य सचिन कळसकर, माजी उपसरपंच पांडुरंग गायकर, तुकाराम राणे, नागोठणे ग्रा. पं. सदस्य अतुल काळे, दिपेंद्र आवाद, रोहा तालुका युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष रोशन पारांगे, रोहा तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष कु.अक्षय नागोठणेकर, युवक विभाग अध्यक्ष निवास पवार, हिराचंद्र शिर्के, ओमकार लाड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.






Be First to Comment