सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶
यंदाचा गणेशोत्सव साधेपणात साजरा होत असून दरवर्षी सजावट आणि गणेश मूर्तीवरिल आभूषणात चिनी अतिक्रमणाला भक्तांनी यंदा नापंसती दाखवली आहे. गेली काही वर्ष सणासुदीला चायना बनावटीच्या वस्तुनी बाजारपेठा काबीज केलेल्या होत्या. परंतु भारत चीन मधील तणाव आणि कोरोनाचा ऊगम असले चीन देशाबद्दल संताप व्यक्त होत आहे.व्यापा-यानी देखील चिनी बनावटीचा माल विक्रीला आणण्याचे टाळल्याचे खालापूर,चौक बाजारपेठेत दिसत होते.
रंगीबेरंगी खङे यामुळे मूर्तीची किंमत दुप्पट होत असली तरि गणेशभक्तांचा आग्रहामुळे गणेशमूर्तीकार वापर करत असत.यंदा माञ हे प्रमाण प्रंचङ घटले आहे.
गेली काही वर्ष गणेशमूर्ती तयार करताना देखील रंगीबेरंगी खङ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे.यावेळी माञ मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांनी चिनी रंगीबेरंगी खङे बसवून मूर्ती नको अशी भूमिका घेतली असल्याचे मूर्तीकार मूकेश आपटेकर यांनी सांगितले.
यंदा अनेकानी गणेशमूर्तीला कृञिम सजावट नको असे सांगितले.यावर्षी अनेक गणेशभक्त आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने ना नफा ना तोटा या तत्वावर मूर्तींची विक्री केली आहे.
मुकेश आपटेकर
-गणेश कला केंद्र तुपगाव चौक


Be First to Comment