Press "Enter" to skip to content

डोलवी येथे फिल्टर प्लांट व व्यायाम शाळेचे उद्घाटन ; स्थानिक स्वराज्य संस्था या गावातील विकासाचा कणा – सभापती वैकुंठ पाटील

पेण, दि. 10 (वार्ताहर) : पेण तालुक्यातील डोलवी ग्रामपंचायतीच्या विकासाला येथील सरपंचांनी अधिकची गती दिली असून गावातील झालेल्या सुविधा पाहता त्यांचा अभिमान वाटत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था या गावाच्या विकासाचा कणा असल्याचे मत रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी यावेळी बोलून दाखवले.

डोलवी ग्रामपंचायतीच्या वतीने येथील फिल्टर प्लांट व अत्याधुनिक व्यायामशाळेचे उदघाटन तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम दि. १० रोजी करण्यात आला.यावेळी सभापती वैकुंठ पाटील, ग्रामपंचायतचे सरपंच परशुराम म्हात्रे, उपसरपंच राजेश्री माळी, सदस्य, रोहन म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अनिल म्हात्रे,
नरदास म्हात्रे, एल.एस.जांभळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी उपस्थित सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.