Press "Enter" to skip to content

डीडीएसआर ग्रुपच्या राहुल हजारे यांना रियल इस्टेट क्षेत्रातील दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान ; अमृता फडणवीस आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते गौरव; ‘रियल इस्टेट एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात उज्वल यश


पनवेल (विशेष प्रतिनिधी):

नवी मुंबई आणि परिसरातील बांधकाम क्षेत्रात अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक कामाच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ‘डीडीएसआर ग्रुप’ (DDSR Group) च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला  गेला आहे. ‘क्रेडाई बाम रायगड’ (CREDAI BANM Raigad) आणि ‘मिड-डे’ (Mid-Day) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘रियल इस्टेट एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ (Real Estate Excellence Awards 2026) सोहळ्यात डीडीएसआर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक तथा दूरदर्शी उद्योजक  राहुल हजारे यांना दोन अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

‘यंग आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ (Young Entrepreneur of the Year), व ‘एक्सलन्स इन टेंडर प्लॉट्स थ्रू को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ (Excellence in Tender Plots through Co-operative Society) असे दोन पुरस्कार या  सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी  अमृता देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल हजारे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सहकारी संस्थेमार्फत टेंडर प्लॉट्सच्या क्षेत्रात बजावलेल्या अभूतपूर्व आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला आहे. रियल इस्टेट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, अत्यंत पारदर्शक कार्यपद्धती, आधुनिक व नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि ग्राहकांच्या विश्वासाला दिलेले सर्वोच्च प्राधान्य यांच्या जोरावर उद्योजक राहुल हजारे यांनी हा बहुमान पटकावला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल  राहुल हजारे आणि संपूर्ण ‘डीडीएसआर ग्रुप’च्या टीमवर राजकीय, सामाजिक तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “हा पुरस्कार म्हणजे आमच्या प्रामाणिक मेहनतीचा व कर्तृत्वाचा यथोचित सन्मान असून, डीडीएसआर ग्रुपच्या यशस्वी वाटचालीतील हा एक नवा सुवर्णटप्पा ठरला आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.