Press "Enter" to skip to content

कर्नाळा खिंडीत किया कारला भीषण आग ; पनवेल महापालिका अग्निशामक दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण; मोठी दुर्घटना टळली


पनवेल, दि.१० (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंड परिसरात धावत्या किया कारेन्स कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.

एमएच ४६ सीव्ही ४५७२ क्रमांकाच्या कारला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिका अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग पसरण्याचा धोका टळला.

या बचावकार्यात तांडेल शिवा आडे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रचालक राहुल सोनावले व केतन जगताप, तसेच फायरमन अमर घरत, तेजेश घरत, शुभम मानेकर आणि एकनाथ बागुल यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, कारला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून, अग्निशामक दलाच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.