Press "Enter" to skip to content

सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीवर ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांची नियुक्ती

पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अवनी मिस्त्री यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक, सर्वसमावेशक आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अँटी-रॅगिंग समिती महत्त्वाची भूमिका बजावते. समितीच्या कार्यात संजय कदम यांचे अनुभव, मार्गदर्शन आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे कॉलेज प्रशासनाने नियुक्तीपत्रात नमूद केले आहे.
रॅगिंगमुक्त कॅम्पस निर्माण करण्यासाठी समितीच्या बैठका व विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग देण्याची अपेक्षा कॉलेज प्रशासनाने व्यक्त केली आहे. तसेच कॉलेजशी असलेले त्यांचे सहकार्य आणि योगदान याबद्दल प्रशासनाने आभार व्यक्त करत, पुढील काळातही त्यांचे मार्गदर्शन लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
संजय कदम यांच्या नियुक्तीबद्दल शिक्षण, सामाजिक व विद्यार्थी क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.