Press "Enter" to skip to content

उ बा ठा पक्षातर्फे कामोठे येथे ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न !

कामोठे : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्यास कामोठेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. ज्येष्ठांचा सन्मान आणि त्यांच्या अनुभवांना मानाचे स्थान देणे, हीच शिवसेनेची सामाजिक बांधिलकी या भावनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी मा.केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते मा.अनंतराव गीते, उपनेते श्री.बबनदादा पाटील, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख श्री. प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख श्री. अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख श्री. दीपक निकम,सौ सुवर्णा वाळुंज शिवसेना प्रवक्ता रायगड जिल्हा, उपजिल्हाप्रमुख श्री.रामदास पाटील, श्री.भरत पाटील, महानगरप्रमुख ॲड.समाधान काशीद, गटनेत्या व नगरसेविका सौ.लीना गरड, नगरसेविका सौ. रितिक्षा गोवारी, नगरसेविका सौ. मेघना घाडगे, विभागप्रमुख श्री. रामदास गोवारी यांच्यासह श्री. सदानंद शिर्के, श्री.यतिन देशमुख, श्री. विश्वास पेटकर,श्री. कैलास पाटील, ॲड.बालेश भोजने, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.