Press "Enter" to skip to content

पेणच्या इतिहासकालीन भुंडा पुलाला आधुनिकतेचा साज ; उत्कृष्ट कामाकरीता ‘श्री रामेश्वर कन्स्ट्रक्शन’ला राज्यस्तरीय गौरव

पेण, ता. 3 (वार्ताहर) : पेणच्या भोगावती नदीवरील इतिहास कालीन भुंडा फुलाला नव्याने आधुनिकतेचा साज देण्यात येऊन त्या पुलाखालील पाणी साचेल असे गाले ठेवल्याने या
100 मीटर उच्चस्तरीय पूलासह बंधाऱ्याच्या दर्जेदार आणि अतिवेगवान कामाची राज्य शासनाकडून दखल घेत या कामाचे कॉन्ट्रॅक्टर तथा समाजसेवक राजूशेठ पिचीका यांना 2025- 2026 उत्कृष्ट पूल पुरस्कार नुकताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी बांधकाम विभाग उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण,आदिवासी विकास पर्यटन, मृद व जलसंधारण इंद्रनील नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव शरद राजभोज, आबासाहेब नागरगोजे, चेतन आखरे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक राजेश निघोट आदिं उपस्थित होते.

पेणचा भुंगा पुल ब्रिटिशकालीन स्थापत्याची साक्ष देत अनेक दशके पेणच्या सामाजिक आणि व्यापारी इतिहासाचा भाग राहिला असल्याने या पुलाकरीता माजी खासदार धैर्यशील पाटील व आमदार रवीशेठ पाटील यांच्या निधीतून पेण- तरणखोप मार्गावरील भोगावती नदीवर सुमारे 100 मीटर लांबीचा उच्चस्तरीय पूल व बंधारा उत्कृष्ट दर्जाने आणि जलद गतीने पूर्ण केल्याबद्दल मे.श्री.रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजूशेठ पिचीका यांना या पुलाकरीता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘उत्कृष्ट पूल पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर कार्यक्रमाला संतोष शेलार, प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव प्रशांत औटी, प्रज्ञा वाळके, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, तत्कालीन कार्यकारी अभियंता अलिबाग सुखदेवे, पेण उपअभियंता डी.एम.पाटील, शाखा अभियंता भरसाट तसेच प्रकाश झावरे, लाहिरी पिचीका, लक्ष्मी पिचिका, नेहा झावरे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.