
पनवेल, दि.३ (वार्ताहर) : कै. प्रदीप गुप्ते यांच्या पत्नी तथा जवाहर को.ऑप इंडस्ट्रीयल इस्टेस्टचे अध्यक्ष स्वप्नील प्रदीप गुप्ते यांच्या मातोश्री श्रीमती स्नेहा प्रदीप गुप्ते यांचे अल्पशा आजाराने दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गुप्ते कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. स्नेहा गुप्ते यांच्या सामाजिक व कौटुंबिक परिचयामुळे अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांच्यावर पनवेल येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुप्ते कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



Be First to Comment