

पनवेल : पोलीस उपायुक्त वाहतूक डॉ. राहुल खाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक गावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल भुजबळ साहेब, पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाळा कुंभार आणि पनवेल महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून, पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी गणेशोत्सवाच्या काळात पनवेल शहरातील वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन केले.
गणेशमूर्ती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या या नियोजनाचे पनवेलकर नागरिकांकडून कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिक शहरात येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेने आगाऊ नियोजन केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरापर्यंत वाहतूक नियोजनाचा संदेश
गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, यासाठी केवळ रस्त्यावर प्रत्यक्ष वाहतूक नियोजन न करता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.



Be First to Comment