Press "Enter" to skip to content

क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल

यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेलापूर

यू बिझनेस मिट आणि संलग्न संस्थांच्या वतीने नुकतेच नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील बी आर एस सी सी एल येथे करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रारंभ करण्यात आलेल्या संकल्पनेने मूर्त रूप धारण केले असून हे उद्घाटन म्हणजे या संकल्पनेची पुढली पायरी मानली जात आहे.

यू बिझनेस मिट चे संस्थापक वैभव सोनटक्के यांनी आपले सहकारी समृद्धी वाणी, पत्रकार विवेक पाटील, पत्रकार मंदार दोंदे आणि संलग्न संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर ची निर्मिती केली आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट, मेडिकल टुरिझम, रिअल इस्टेट, ग्लोबल मिडिया, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, क्लाऊड एंटरप्रेनरशिप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बँकिंग अँड फायनान्स, कन्स्ट्रक्शन अशा नानाविध क्षेत्रातील होतकरू आणि विजिगीशू वृत्तीच्या व्यावसायिकांना थायलंड देशाबरोबर व्यवसाय करण्याकरता हे कॉरिडोर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे असे वैभव सोनटक्के यांनी सांगितले.तसेच आगामी काळात मॉरिशस, दुबई आणि अमेरिका या देशांच्या समवेत क्रॉस बाउंड्री व्यवसाय करण्याकरता यू बिझनेस मीट पंख पसरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंटरनॅशनल बिझनेस कॉरिडोरचे उद्घाटन करत असतानाच यु बिझनेस मीट यांच्यावतीने कॉर्पोरेट बिझनेस सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे. व्यवसाय संधी शोधणाऱ्या होतकरूंना अल्प शुल्कात कार्यालय या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करत असणाऱ्या होतकरूंना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना लीगल ॲडव्हाइस, सरकारी परवाने, आंतरराष्ट्रीय व्यवसाय करार आदी महत्त्वपूर्ण दस्तावेज बनवण्याकरता यु बिझनेस मिटने पुढाकार घेतला आहे.

थायलंड वरून पिटा मुख्य संचालक तथा थायलंड इंबसी ॲडव्हायझर प्रसर्त पियासाचादेश यांनी ऑनलाइन उपस्थित राहत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यु बिझनेस नीट च्या माध्यमातून भारत आणि थायलंड यांच्यातील व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी यावेळेस प्रशंसा केली. यु बिझनेस मिट च्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार,दैनिक महासागर संचालक तथा मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक , महाव्यवस्थापक रायगड दत्ता कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे श्रीकृष्ण चांडक हे शुभेच्छा देण्यासाठी खास नागपूरहून नवी मुंबई येथे आले होते.

 यू बिझनेस मिट चे संस्थापक वैभव सोनटक्के यांनी क्रॉस बाउंड्री बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या विषयाबाबत उपस्थितांशी संवाद साधला. समृद्धी वाणी यांनी या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले तर पत्रकार मंदार दोंदे आणि पत्रकार विवेक पाटील यांच्या समन्वयाने पुढील आठवड्यामध्ये ग्लोबल जर्नलिझम या विषयाच्या अनुषंगाने थायलंड मधील शिष्टमंडळासोबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.