
प्रतिनिधी
दि. २९ ते ३१ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेली “३ री आंतरराष्ट्रीय जागतिक मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. भारतासह बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान, भूतान आणि श्रीलंका या देशांतील खेळाडूंनी स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावाचे दर्शन घडवत रोमांचक सामने खेळले.
अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीनंतर भारताच्या वतीने महाराष्ट्रातील खेळाडूंनी खालीलप्रमाणे पदके पटकावली:
सुवर्ण पदक 🥇 – 11
- वैदेही पाटील
- भार्गवी म्हात्रे
- सारा कोठेकर
- अन्वी म्हात्रे
- निर्मान पाटील
- आयुष पिंगळे
- स्मित सकपाळ
- परी महाडिक
- स्वरांगी मोरे
- आतेश साळवी
- आराधना निवले
रौप्य पदक 🥈 – 5
- यश ठाले
- अनिकेत पिंगळे
- नेहा पवार
- चैतन्य पिटाळे
- रुद्र येरपुडे
कांस्य पदक 🥉 – 4
- अंश पाटील
- अंकित पिंगळे
- संस्कार वर्गुडे
- आदित्य गायकवाड
विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
तसेच श्री.विनायक सकपाळ (आंतरराष्ट्रीय मुख्य पंच)
मुकेश भगत (आंतरराष्ट्रीय पंच)
प्रणाली पाटील (आंतरराष्ट्रीय पंच)
रोहन शेवाळे (आंतरराष्ट्रीय पंच)
अवधूत घरत (राष्ट्रीय पंच)
हितेश भगत (राष्ट्रीय पंच)
योगेश पाटील (राष्ट्रीय पंच)
योगेश वारगुडे, (राष्ट्रीय पंच)
संजय सपकाळ (राष्ट्रीय पंच)
धृती लाड (राष्ट्रीय पंच)
श्री.सागर शेलार (भारतीय संघ – मुख्य प्रशिक्षक)

श्रेयस म्हसकर (महाराष्ट्र संघ- प्रशिक्षक) या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले
मान्यवरांचे मत
मिक्स बॉक्सिंग राज्य असोसिएशन, महाराष्ट्रचे महासचिव नारायण कराळे म्हणाले, “या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मिक्स बॉक्सिंग खेळाला अधिक बळ मिळाले असून, खेळाडूंना जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.”
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नेपाळ मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षा सीता श्रेष्ठा व राजेश तमंग यांनी पंच, प्रशिक्षक, स्वयंसेवक, प्रायोजक तसेच सर्व सहभागी देशांच्या प्रतिनिधींचे विशेष आभार मानले.
याप्रसंगी भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाचे संस्थापक महासचिव राकेश म्हसकर म्हणाले, “भविष्यातही अशाच दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करून मिक्स बॉक्सिंग खेळाचा प्रसार आणि विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.”
अभिनंदन
विजेत्या सर्व खेळाडूंचे भारतीय मिक्स बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षा *मा.आदितीताई तटकरे मॅडम (कॅबिनेट मंत्री – महिला व बाल विकास कल्याण) तथा राष्ट्रीय अध्यक्षा – भारतीय मिक्स बाॅक्सिंग महासंघ , भारतीय महासंघाचे संस्थापक महासचिव *राकेश म्हसकर*, श्री.अनिकेत भाई तटकरे (आमदार) तथा अध्यक्ष – मिक्स बॉक्सिंग राज्य असो. महाराष्ट्र *, कार्याध्यक्ष प्रशांत मोहिते, महासचिव नारायण कराळे, उपाध्यक्ष डॉ. रवी बारापात्रे, खजिनदार गणेश पेरे, सहसचिव विनोद दाढे तसेच महाराष्ट्राचे टेक्निकल डायरेक्टर निवृत्ती काळभोर यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




Be First to Comment