Press "Enter" to skip to content

राजकीय पूर्व वैमन्यासातून मयूर वनगे यांच्यावर हल्ला

भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षासह तिघांवर गुन्हे दाखल

पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील व्यावसायिक मयूर वनगे यांच्यावर दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास वनगे फार्म हाऊस कामार्ली येथे भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी व त्यांच्या तीन साथीदारांनी जोरदार हल्ला करून त्यांना मारहाण केली याप्रकरणी चार जणांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी मयूर वनगे आपल्या मालकीच्या असणाऱ्या कामार्ली कुरमुरर्ली येथील फार्महाऊसवर रात्री जेवण आणण्यासाठी गेले होते तीथे असणाऱ्या किचनमध्ये ते बसले असता पाठीमागून आलेले मंगेश दळवी, हरेष दळवी, रुपेश दळवी आणि रंजीत दळवी या चौघांनी त्यांना लोखंडी रॉड, पाईप व लाठी काट्यांसह तलवारीने जोरदार मारझोड केली तर मंगेश दळवी यांनी त्यांच्याकडील रिवाल्वर काढून त्याची नळी तोंडात भरून तुला ठार मारतो अशी धमकी दिली.

यादरम्यान त्याच्या डोक्याला, दोन्ही हातांना, पोटाला तसेच पायाला फार मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. यात मयूर याच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळ्याची चैन आणि रोख रक्कम ८० हजार घेऊन त्यांनी तिथून त्यांनी पळ काढला असल्याची तक्रार फिर्यादी मयूर वनगे यांनी पेण पोलीस ठाण्यात दिली असून याबाबत सदर चौघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतचा अधिक तपास पेण पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश राजपूत करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.