Press "Enter" to skip to content

सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

शिवसेना धोंडखारच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

रोहा : समीर बामुगडे

शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेना धोंडखार यांच्या माध्यमातून धोंडखार, खैराळे आणि गडबल येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम ग्रामस्थांकडून आणि पालकांकडून कौतुकास पात्र ठरला.

या सामाजिक उपक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चनेरा उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ, युवा सेना उपतालुका प्रमुख सुदर्शन गावडे, शिवसेना शाखाप्रमुख सनी म्हात्रे, खैराळे उपशाखा प्रमुख रामचंद्र गंभे, युवा सेना चनेरा विभाग सचिव नितीन ठाकूर, महिला आघाडी उपतालुका प्रमुख मेघा सावंत, माजी सदस्य शाम गोंधळी, माजी सदस्य गणेश गावडे, माजी उपसरपंच महादेव मोरे, तसेच शिवसेना कार्यकर्ते सुजित गावडे, रघुनाथ म्हात्रे आणि नारायण गावडे उपस्थित होते.

याशिवाय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व इतर आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर आपल्या आयुष्यात मोठे यश संपादन करावे, असे आवाहन केले. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शिक्षणामुळे माणसाला योग्य विचार, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्याबरोबरच शिक्षणाबद्दल अधिक प्रेरणा मिळाली. शिवसेना धोंडखार यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी आणि पालकांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.