Press "Enter" to skip to content

अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कार्याबद्दल सुभाष पाटील यांचा पनवेल महानगरपालिकेतर्फे विशेष सत्कार

पनवेल, प्रतिनिधी : महाराष्ट्र तायक्वांडो संघटनेचे सहसचिव तथा आंतरराष्ट्रीय तायक्वांडो तांत्रिक अधिकारी श्री. सुभाष पाटील यांनी नुकत्याच हैदराबाद येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धा (All India Police Games) मध्ये चॅम्पियनशिप डायरेक्टर (Championship Director) म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, तांत्रिक कौशल्य, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि निष्पक्ष कार्यपद्धतीमुळे संपूर्ण स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय पोलिस क्रीडा संघटनेतर्फे श्री. पाटील यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. यापूर्वीही त्यांनी काश्मीर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये स्पर्धेचे यशस्वी नियोजन व संचालन करून आपल्या कार्याची छाप पाडली होती.

या राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पनवेल महानगरपालिकेचे महापौर मा. नितीन पाटील महिला व बालविकास सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते श्री. सुभाष पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर नितीन पाटील म्हणाले, “पनवेलमधील एक व्यक्ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तायक्वांडो क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने कार्य करत असून, निष्पक्ष आणि निस्वार्थ सेवेद्वारे देशभरातील खेळाडूंना न्याय मिळवून देत आहे, ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे. श्री. सुभाष पाटील यांची सातत्यपूर्ण प्रगती पनवेल तसेच रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावत आहे.”

रायगड जिल्ह्याचे सुपुत्र असलेले श्री. सुभाष पाटील यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी बजावत भारतीय तायक्वांडो क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्र तायक्वांडो परिवारासह रायगड जिल्ह्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.