Press "Enter" to skip to content

“आई भवानी शक्ती दे मंलगगडाला मुक्ती दे “

४४ वर्ष जुन्या मलंगड खटल्याला पुन्हा कलाटणी नव्या दावेदारांचा पंधरा वर्षानंतर अर्ज फेटाळला

मुंबई प्रतीनिधी : (सतिश पाटील )

अंबरनाथ तालुक्यातील वादग्रस्त मलंगड संदर्भातला 44 वर्ष जुना 1/82 या दाव्याला कोर्टात पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. या दाव्याचा निकाल लागेल अशी अपेक्षा असताना शुक्रवारी ३१जुलै२०२६ या दाव्यातले नवे दावेदार एकनाथ शिंदे, दिनेश देशमुख आदी सात जणांचा दावेदार म्हणून असलेला अर्जच कोर्टाने फेटाळून लावला.
खरंतर हाजीमलंग की मलंगगड याचा तब्बल 44 वर्षानंतर आता निकाल लागेल, अशी अशा धरून बसलेल्या हिंदू भाविकांमध्ये त्यामुळे कमालीचे नैराश्य बघायला मिळाले.

1982 साली मोहन दादा गोखले यांनी आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली हा दावा ठाणे सत्र न्यायात दाखल केला होता दरम्यान मोहन दादांसह त्यांचे दावेदार असलेले इतर सहकारी देखील निधन पावले. त्यानंतर या दाव्यात इतर अनुयायांनी वारसदार म्हणून दावेदार पार्टी होणे होते. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिनेश देशमुख, गावडे असे सात जण नव्याने पार्टी झाले मात्र हे पार्टी होण्याचा अर्ज तब्बल 2000 पेक्षा जास्त दिवस उशिर झाल्याचं निरीक्षण नोंदवत हा अर्जच निकाली काढण्यात आला.

आता हिंदू पक्षकारांना पुन्हा एकदा उच्च न्यायालयात या संदर्भात अपील दाखल करावे लागणार आहे. पहिल्या दाव्यात 44 वर्ष लोटल्यानंतर आता आपल्याला किती वर्ष लागतील तोवर आपण जिवंत असू का असा नैराश्यजनक प्रश्न या चळवळीतील कार्यकर्ते विचारत आहेत.

देशातील अनेक ठिकाणी हिंदूंची मंदिरे तीर्थस्थाने, प्रार्थनास्थळे ही 15 ते 17 व्या शतकात आक्रमक मुस्लिमांनी जबरदस्तीने काबीज केली होती. तर अनेक हिंदू प्रार्थना स्थळांमध्ये हिंदूंची वहिवाटच नगण्य होती ती आपसूकच इतरांच्या ताब्यात गेली. त्यापैकीच नाथपंथीयांचे श्रद्धास्थान असलेला हा मलंगगड त्यावर मुस्लिमांनी आपला ताबा आणि हक्क सांगितला. मलंगबाबा हे मुस्लिम पीर असल्याचे दाखवून तिथे आपली वहिवाट वाढवली 75 ते 80 च्या काळात स्वर्गीय मोहनदादा गोखले, आनंद दिघे, अच्युत शेट्टी, श्रीपाल मलाणी, दिनेश देशमुख अशा पाच नाथ भक्तांनी मलंगभक्तीचा लढा मुक्तीचा लढा पुकारला त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एखाद्या महायज्ञाचे स्वरूप दिले. हिंदूंच्या फौजा मलंगडाकडे जाऊ लागल्या दरम्यानच्या काळात एक प्रचंड मोठी चकमकही या गडावर घडली त्यात आनंद दिघेंनाही प्रचंड मारहाण झाली होती वातावरण चिघळले होते त्यानंतर तब्बल 40 वर्ष हा मलंग मुक्तीचा खटला विविध सरकार दरबारी व बोर्ड आणि कोर्ट कचेरीत अडकला होता. तो तिथेच म्हातारा होऊन मरेल की काय अशी टीका देखील होत होती.

दरम्यानच्या काळात दोन वेळा हिंदुत्ववाद्यांचे महाराष्ट्रात सरकार आले. त्यांनी लवकरच हा निर्णय लागेल, अशी आशाही निर्माण केली होती. प्रत्यक्षात मात्र दुर्गाडी आणि मलंगडा बाबत कुणाचीही कसलीही मदत मिळाली नाही एकाकी दोन-चार लोक या कोर्टकचेरीच्या तारखांसाठी अख्खं आयुष्य पणाला लावून टाचा झिजवत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.