
पनवेल, दि. १९ जुलै : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनतर्फे शेडुंग येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ५०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात रोटेरियन्स, ॲन्स, ॲनेट्स, रोटरॅक्टर्स तसेच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमासाठी वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल वन विभागाचे, तसेच मोफत रोपे उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. महापौर श्री. नितीन पाटील यांचे क्लबतर्फे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो. डॉ. जयश्री पाटील म्हणाल्या, “झाडे लावणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढ्यांना निरोगी व समृद्ध पर्यावरण देण्याची आपली सामूहिक बांधिलकी आहे. आज लावलेले प्रत्येक रोप उद्याच्या हरित भविष्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.”
या उपक्रमात अध्यक्षा रो. डॉ. जयश्री पाटील, माजी अध्यक्ष रो. डॉ. प्रकाश पाटील, सचिव रो. ॲड. हितेश राजपूत, माजी अध्यक्ष रो. अली असगर व्होरा (संचालक – पर्यावरण सेवा), माजी अध्यक्ष रो. चारुदत्त भगत (प्रकल्प समन्वयक व फेलोशिप चेअरमन), आयपीपी रो. निलेश पोटे, माजी अध्यक्ष रो. राजेंद्र ठाकरे, माजी अध्यक्ष रो. चंद्रशेखर पन्हाळे, अध्यक्ष-निर्वाचित रो. विनोद गुरमे, रोटरॅक्ट अध्यक्ष मनस्वी, रो. डॉ. बाहुबली व रो. कल्पना नागावकर, रो. ॲड. दिपाली बोहरा, रो. माधुरी श्रीनिवास कोडुरू, रो. महेंद्र उरणकर, रो. शुभदा भगत, रो. सुनील बोराडे, रो. मितेश फके, रो. डॉ. गौरी शिवानी, तसेच ॲन्स, ॲनेट्स, रोटरॅक्टर्स आणि लाईफलाईन हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
वृक्षारोपणानंतर सर्व सहभागींसाठी वडापाव व चहाचा आस्वाद घेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला.




Be First to Comment