Press "Enter" to skip to content

अवैध दारूविक्रीवर कडक कारवाई करणार- आदीत्य पवार


पनवेल (प्रतिनिधी) नवनियुक्त राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रायगड आदित्य पवार यांनी आपल्या पदाचा नुकताच पदभार स्वीकारल्यावर रायगड जिल्ह्यात अवैध दारूविक्री व गावठी दारू विक्रेत्यांना कडक इशारा देत कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

छञपती संभाजी नगर येथे शालेय व महाविद्यालय शिक्षण पुर्ण करून त्यांनी साॅप्टवेअर इंजीनियरींगचे शिक्षण घेऊन आपल्या जिवलग मिञपरीवारांचा कल शासकीय सेवेकडे असल्याचे त्यांनी पारखल्याने आदीत्य पवार हे देखील शासकीय सेवेत आल्याचे समजते
हिंगोली येथे कार्यरत असताना आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एका मोठ्या कारवाईदरम्यान सुमारे 1.65 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.23 ते 25 मे 2026 या कालावधीत जिल्ह्याभरात अवैध दारूविक्री व दारू वाहतुकीविरोधात एक विशेष मोहीम अधिक्षक आदित्य पवार यांनी राबविली होती विविध बीट अंतर्गत त्यांच्या अधिकारी व कर्मचारी पथकाने औढा तालुका परीसरात धाडसञ राबवुन 21 आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत 1949 चे कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.

या कारवाईत गावठी दारू भट्टया अवैध दारू करीता वापरण्यात येणारी वाहनेही जप्त करण्यात आल्याने अवैध दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले होते रायगड जिल्ह्याबाबत त्यांनी पञकारांशी बोलताना आपली भुमिका स्वष्ट करताना सांगीतले की रायगड जिल्ह्यातील गावठी दारू भटट्या पुर्णता उध्वस्त केल्या जातील व संबधीतांवर कठोर कारवाई केली जाईल तसेच रायगड जिल्ह्यातील अवैध्य दारू विक्री अथवा दिव दमणची काही बार रेस्टाॅरन्ट मध्ये जी छुपी विक्री केली जात असल्याची माहीती प्राप्त होत आहे त्यांवर कठोर पावले उचलण्याचे माझ्या अधिकारी वर्गाला मी सुचना दिल्या आहेत
प्रशासकीय कामाबद्दल पारदर्शकता बाळगुन माझ्या अखत्यारीतील कामचा व विविध तालुकानिहाय कार्यालयातील कामकाजाचा सातत्याने आढावा घेऊन व्यावसाईकांची कामे मार्गी लावुन चांगल्या पध्दतीने काम करण्याचा माझा मानस असेल असे नवनियुक्त राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रायगड यांनी बोलताना सांगीतले

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.