Press "Enter" to skip to content

मनसेकडून सिद्धेश पावले यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती


पनवेल, दि. 18 (वार्ताहर): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड क्षेत्रातील करंजाडे नोड शहराध्यक्षपदी सिद्धेश पावले यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले असून, पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात मनसेची ध्येय-धोरणे आणि पक्षाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पक्ष संघटनेत शिस्त राखणे, कोणत्याही प्रकारची कुरापत किंवा तडजोड न करणे आणि समाजात पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही नियुक्ती प्रारंभी एका वर्षासाठी करण्यात आली असून, संबंधित पदाचा कार्यअहवाल व कामगिरीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सिद्धेश पावले यांच्या नियुक्तीमुळे करंजाडे व उत्तर रायगड परिसरातील मनसेच्या संघटनात्मक कामाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून आगामी काळात पक्षविस्तारासाठी ते सक्रियपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.