Press "Enter" to skip to content

कोळीवाडा ते बंदर रोड पकटी मार्गे रोड होण्याची परिसरातील नागरिकांची मागणी

पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील गाढी नदीला लागून असलेल्या कोळीवाडा ते बंदर रोड पकटी मार्गे नवीन रस्ता करण्याची मागणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने करीत असून याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मेरीटाईम बोर्ड (सागरी महामंडळ) ने लक्ष घालण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

दरवर्षी मुसळधार पावसामध्ये कोळीवाडा पाण्याखाली जातो व त्यांचे अतोनात नुकसान होते. कोळी बांधव हे लोकांच्या मदतीला नेहमीच धावत असतात. या भागातून पकटी मार्गे बंदर रोड येथे एक वेगळा मार्ग काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. परंतु या गोष्टीकडे महाराष्ट्र शासनाच्या मेरीटाईम बोर्ड (सागरी महामंडळ) दुर्लक्ष करीत आहे. हा मार्ग तयार झाल्यास त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात कोळी बांधवांना होणार आहे. तरी शासनाने याकडे लक्ष घालून हा मार्ग बनवावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.