
वाशी पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रितेश माळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पेण ( प्रतिनिधी ) -: रायगड जिल्हा परिषदेच्या पाच आणि पेण पंचायत समितीच्या दहा जागांसाठी निवडणुक होत असताना वाशी पंचायत समिती गणातून प्रितेश माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की खारेपटातील जनता गेली अनेक वर्ष पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जात असताना येथील खारेपाट संकल्प संघटनेच्या वतीने केलेल्या आमरण उपोषणाला येथील जनतेचा जास्तीत जास्त सहभाग लाभावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून या उपोषणाला बळ देत आलो आहे खारेपाटाच्या या उपोषणामुळे सरकारला जाग आली आणि याकरिता कोट्यावधी रुपयांच्या निधीची उपलब्ध झाला खरा मात्र अजूनही खारेपटाला पाणी पोहोचलेला नाही त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून येथील जनता योग्य उमेदवार निवडतील कारण येथील जनता आता सुज्ञ झाली आहे त्यांचा मिळणारा पाठिंबा आमच्यासाठी आर्शिवाद ठरणार असल्याचे वक्तव्य प्रितेश माळी यांनी यावेळी बोलून दाखवले.



Be First to Comment