Press "Enter" to skip to content

हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील जयंती कर्जत येथे साजरी

कर्जत : (सतिश पाटील)

सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी कर्जत तालुका आगरी समाज संघटना ह्यांच्या वतीने हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील ह्यांची ११२ वी जयंती मोठ्या उत्साहात मानिवली नेरळ ह्या त्यांच्या जन्मगावी संपन्न झाली.

ह्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कामगार नेते श्री महेंद्रशेठ घरत, कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे संस्थापक सदस्य श्री सावळाराम ठाकूर गुरुजी ह्यांना आगरी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर माजी अध्यक्ष कै तुकाराम कोळंबे ह्यांना मरणोउपरांत आगरी समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवविण्यात आले.
ह्यावेळी कर्जत तालुक्यातील आगरी समाजातील वर्ष २०२५-२६ मध्ये उत्तीर्ण झालेले सीए, डॉक्टर, इंजिनियर, तालुक्यातून MPSC पास झालेले मान्यवर, खेळात प्राविण्य प्राप्त केले खेळाडू ह्यांचा सन्मान करण्यात आला.

ह्यावेळी तालुक्यातील ५ बँजो पथकांनी आपली कला सादर केले त्यांचे ही सन्मान ह्यावेळी करण्यात आला, तर सामजिक विषय घेऊन १३० किलोमीटर सायकलिंग करणारा ७ वी इयत्तेत असलेल्या हिरेन राम हिसळके ह्याचा ही विशेष सन्मान ह्यावेळी करण्यात आला.

आपल्या अध्यक्षिय भाषणात संस्थापक अध्यक्ष- आगरी कोळी युथ फाऊंडेशन सीए निलेश ज्ञानेश्वर पाटील यांनी हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि हुतात्मा वीर भाई कोतवाल ह्यांच्या शौर्याचे स्मरण केले, हुतात्मा हिराजी पाटील ह्यांची जन्मतारीख शोधणाऱ्या श्री वसंत कोळंबे साहेबांचे विशेष कौतुक केले, समाजातील वीरांचा आणि समाजासाठी सर्वस्व देणाऱ्या थोरांचा इतिहास लिहिला पाहिजे जपला पाहिजे, आणि त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेब ह्यांचे नाव लागावे ह्या साठी सुरू असलेल्या
चळवळीत समस्त कर्जतकरांनी सामील होण्याचे आवाहन केले, तसेच संघटित राहून समाजाला आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे ही आवाहन ह्यावेळी केले.

ह्यावेळी कार्यक्रमाला माझ्या सह कामगार नेते महेंद्रशेठ घरत, AKYF चे हिमांशू पाटील , राज पाटील, तसेच कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, वसंत कोळंबे, सावळाराम जाधव, एकनाथजी धुळे, सुरेशदादा टोकरे, शिवनाथबाबा, शिवाजी कराळे, सूर्यकांत चिंचे , जितेंद्र गवळी, मनीषाताई दळवी, कृष्णा पाटील आणि संघटनेचे आणि स्मारक समितीचे पदाधिकारी आणि समाज बांधव आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.