Press "Enter" to skip to content

उरण, खालापूर येथे महेंद्रशेठ घरत अर्ज भरण्यासाठी जातीने हजर

निवडणुकांच्या रणधुमाळीत महेंद्रशेठ घरत  यांचे कार्यकर्त्यांना बळ!

उलवे, ता. २० : महेंद्रशेठ घरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. 
जासई येथे हुतात्म्यांना आणि लोकनेते दि. बा. पाटील यांना आंतरराष्ट्रीय कामगार नेते, कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी सकाळी अभिवादन केले. त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयान केले.

मंगळवारी (ता. २०) खालापूर तालुक्यातील रिस गणातून पंचायत समिती उमेदवार निखिल ढवळे यांचा, तर जासई जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून अॅड. अविनाश ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत जातीने हजर होते.

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील. कारण दिबांचे नाव विमानतळाला अद्यापही दिलेले नाही, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना अद्यापही साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळाले नाहीत. त्यामुळे जनतेत रोष आहे. उरण नगरपरिषद निवडणुकीत चमत्कार झाला तसाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काम प्रामाणिकपणे करावे, मी आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे.”
 यावेळी मुरलीधर ठाकूर, अंगद ठाकूर, आनंद ठाकूर आणि कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.