
इंन्डोर गेम हॉल मधील ब्रास पंचधातुच्या वस्तूंची चोरी दोघांना अटक
पेण, ता. १९ (वार्ताहर) : पेण नगरपरिषद येथील इंन्डोर गेम हॉल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बनवण्यासाठी
१ लाख २१ हजार ९०० रुपये किमतीची ब्रास या पंचधातुच्या वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी आयटीआय कॉलेजच्या बाजूला असणाऱ्या झोपडपट्टीतील तरूण विलास चव्हाण वय. २१ वर्ष, राम विजय गवळी उर्फ रामा रेड्डी वय ३७ वर्ष या दोघांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेही शहरात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे काम नगरपालिकेच्या इंन्डोर गेम हॉलमध्ये सुरू आहे.सदर पुतळ्या साठी १ लाख २१ हजार ९०० किंमतीचे ब्रास या पंचधातुच्या वस्तु दि. १४ च्या मध्यरात्री ते १५ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायदया करीता गोडावुन मधील उघड्या खिडीकीमधुन आतमध्ये प्रवेश करून चोरी करून नेल्याची तक्रार चिंचपाडा येथील फिर्यादीने पेण पोलीस ठाण्यात केली होती.
सदर गुन्हयाचा तपास डीवायएसपी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सुचना प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण कक्षातील अधिकारी अंमलदार यांनी सुरू केला असता आजुबाजुच्या सीसीटीव्ही फुटेजच्या व गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयीत ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या चौकशीअंती आरोपीत तरूण विलास चव्हाण वय. २१ वर्ष, राम विजय गवळी उर्फ रामा रेड्डी वय ३७ वर्ष, दोन्हींं राहणार पेण आयटीआय कॉलेजच्या बाजुची झोपडपट्टी व यातील त्यांचा तिसरा साथीदार यांनी सदरची आणि या अगोदरचीही चोरी केल्याचे कबूल केले असून सदरचा माल हस्तगत केला आहे.
याकरीता पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या सुचनाप्रमाणे गुन्हेप्रकटीकरण कक्षातील अधिकारी सहा, पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण, राजेश पाटील, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, गोविंद तलवारे, संदिप शिंगाडे यांनी यशस्वी कामगिरी केली.



Be First to Comment