
पेण, ता. १३ (वार्ताहर) : केंद्र सरकारने विकसित भारतासाठी ग्रामीण भागाकरीता आणलेली जी रामजी ही नवी योजना ग्रामीण विकासाचा नवा मापदंड ठरणार असल्याचे खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
महात्मा गांधींच्या पारंपरिक दृष्टिकोनाऐवजी जी रामजी या नव्या कार्यपद्धतीमुळे पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि गावांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण अशा शब्दांत ही जी रामजी योजना रोजगार हमी योजने सारखी आहे.येत्या काळात रोजगार हमी योजनेचे नाव बदलून आलेली जी रामजी योजना ही अकुशल कामगारांना विविध लाभांसह १२५ दिवस रोजगाराची परफेक्ट हमी दिली जाणार असल्याने या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील युवकांनी घ्यावे असेही यावेळी खासदार तथा भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर, उप सभापती नितीन पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रघुनाथ दळवी, मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील, वाशी सरपंच संदेश ठाकूर, सोसायटी चेअरमन प्रफुल्लभाई म्हात्रे, कमलाकर पाटील आदिंसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.



Be First to Comment