


महात्मा फुले आर्ट सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय पनवेलच्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे
पनवेल (प्रतिनिधी ) महात्मा फुले आर्ट सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय पनवेल व रायगड तायकवोंडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास ७०० विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर गणेश ठाकूर प्राचार्य एम पी ए एस सी कॉलेज पनवेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, सुभाष पाटील हे आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी असून ते स्वतः कॉलेज साठी दरवर्षी आपल्या विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण देतात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींना तायक्वॅान्डो या खेळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून दिलेली आहेत खेलो इंडिया स्पर्धेसाठी आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी निर्मिती दत्ता हिची निवड झाली होती.
कॉलेजच्या विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक शक्तीला चालना देण्यासाठी तसेच कॉलेज आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याचा उद्देशाने त्यांना स्वयंसेरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींची सेड काढण्याचे प्रकार घडतात. अनेकदा त्यांच्यावर वाईट प्रसंग ही वाढवतात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील तेव्हा अशा प्रकारच्या घटनाही वारंवार घडतात. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थिनींचे स्वयंरक्षणासाठी आत्मबल वाढले पाहिजे त्याचबरोबर मुलींनी गुन्हेगारी विरोधात लढण्यासाठी सक्षम व्हावे या उद्देशाने महात्मा फुले कॉलेज अंतर्गत असे उपक्रम राबविण्यात येतात.
हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पंच सातवी डिग्री व मुख्य प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे सहकारी अनिल म्हात्रे , तेजस माळी ,अक्षता भगत , निर्मिती दत्ता पल्लवी म्हात्रे श्रेया लालु द्रुवल सालियान समर्थ बराटे आणि सनी पासवान इत्यादींचे मार्गदर्शन लाभले विशेष म्हणजे या सेमिनार साठी महाविद्यालयच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या आणि त्यांनी ही प्रशिक्षण घेतले असे सुभाष पाटील नी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



Be First to Comment