
पेण हद्दीतील शासकीय भूखंड हडप करणाऱ्यावर कारवाई करा : अमोद मुंडे
पेण (वार्ताहर) : पेण शहराच्या उत्कर्ष नगर जवळ असणाऱ्या शासकीय भूखंड सर्वे नंबर ४९५ यातील १२.४० क्षेत्र हडप करणाऱ्या विश्वास वाघ याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता अमोद मुंडे, नागेश सुर्वे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की सदरचा शासकीय सर्वे नंबर ४९५ भूखंड यावर पुर्वी खाण असा उल्लेख असून ही महाराष्ट्र शासनाची जागा आहे.परंतु यातील २ गुंठे जागा ही शासनाने आदिवासी समाजाचे विश्वास कानू वाघ यांना घर बांधणीसाठी देऊन त्यावर त्यांनी घर बांधलेले आहे. नगरपालिकेत त्यांनी घराची तात्पुरत्या स्वरूपात परवानगी घेतल्याचे दिसत असताना ते घर बेकायदेशीर ठरत आहे.त्यामुळे यातील उर्वरित १२.४० गुंठे जागा आजही शिल्लक असताना त्या जागेवर विश्वास वाघ यांनी अतिक्रमण करून तीही जागा हडप करण्याचा डाव आखला असल्याने शासनानी ती जागा स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यावर आदिवासी भवन किंवा यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात यावी अशी मागणी आम्ही २०१७ पासून केली आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी विश्वास वाघ यांनी आदिवासी समाज एकत्र करत आमच्यावर आरोप केले आहे की माहिती अधिकाराखाली या दोन व्यक्ती मला नाहक त्रास देत आहेत माझा घर व जागा हडप करण्याचा हेतू असून ते ब्लॅकमेलिंग करत आहेत हे आरोप विश्वास वाघ यांनी सिद्ध करून द्यावे असे सांगत आमची मागणी ही सदरचा शासकीय भूखंड हडप करत असणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करत विश्वास वाघ यांच्यावर आब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे अमोद मुंडे आणि नागेश सुर्वे यांनी शेवटी सांगितले.
सदरच्या जागे संदर्भात विश्वास वाघ यांनी केलेल्या मागणीनुसार ते प्रकरण शासन स्तरावर गेलेला आहे.जो पर्यंत वरीष्ठ स्तरावरून तो अहवाल येत नाही तोपर्यंत पुढील निर्णय घेता येत नाही वरिष्ठ स्तरावरून काय अहवाल येतोय त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
तानाजी शेजाळ- तहसीलदार, पेण



Be First to Comment