
मतदान करा व पिठाच्या मजुरीवर किलोवर २ रुपये सवलत मिळवा ; जयहिंद मसाला अँड फ्लोअर मिल ची घोषणा
पनवेल ( वार्ताहर): येत्या १५ जानेवारी रोजी महानगर पालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे यासाठी पनवेल च्या एका सुप्रसिद्ध कांडप चालकाने एक भन्नाट आयडीया केली आहे. मतदान करा व पिठाच्या मजुरीवर तब्बल दोन रुपये प्रतिकिलो सवलत मिळवा असे आवाहन पनवेल येथील जयहिंद मसाला अँड फ्लोअर मिल तर्फे मतदारांना करण्यात आले आहे.
जयहिंद मसाला अँड फ्लोअर मिल तर्फे निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर वेगवेगळ्या योजनांद्वारे ग्राहकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येते. त्याचप्रमाणे यंदाही मतदान करा व पिठाच्या मजुरीवर सवलत मिळवा असे आवाहन त्यांनी केले आहे. ही योजना १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२६ असून प्रति किलो २ रुपये अशी सवलत मिळणार आहे.
या फ्लोअर मिल चे मालक समीर माखेजा हे नेहमीचं अशाप्रकारे आपल्या वेगळ्या शैलीत समाजसेवा करीत असतात. त्यांना समाज सेवेचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहेत. त्यांचे वडील रमणीक माखेजा हे पनवेल चे माजी नगरसेवक होते व आपल्या लढवय्या स्वभावामुळे प्रसिद्धही होते. भ्रष्टाचार, अन्याय या विरुद्ध त्यांनी नेहमीच लढा दिला आणि गोर गरिबांना मदत केली. हेच गुण समीर माखेजा यांच्या ही अंगी आले आहेत. आपला धंदा व्हावा म्हणून त्यांनी ही योजना राबवली नाही किंबहुना त्यांना याची गरज नाही कारण त्यांच्या कडे कायम लोकांचा ओघ असतो. आपले दळन दळण्यासाठी लोकांना वाट बघावी लागते. कायम मोठी गर्दी त्यांच्या कडे असते तरीही केवळ लोकांना मतदानाविषयी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांची ही धडपड आहे.
तरी यासाठी रायगड बाजार, मार्केट यार्ड पार्किंग, वैभव हॉटेल च्या मागे, पनवेल मो. नं – 9702244033 / 9320044033 येथ संपर्क साधावा.



Be First to Comment