


पनवेल :—– पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी पनवेल परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्यापूर्वी 2017 सालच्या गेल्या महानगरपालिका निवडणुकीत याच मुख्यमंत्री महोदयांनी दोन महिन्यात सिडको मुक्त नवी मुंबई करणार अशी घोषणा केली होती, आज आठ वर्षे होऊन गेली तरी ती घोषणा अद्याप पूर्ण करण्यात आली नाही, अगोदर त्याचे काय झाले ते सांगा, मग पुढील संवाद साधा असा संतप्त सवाल पनवेल उरण हौसिंग फेडेरेशनचे अध्यक्ष व प्रभाग 16 मधील अपक्ष उमेदवार मल्लिनाथ गायकवाड यांनी केला आहे. त्या घोषणेची 2017 मधील वर्तमान पत्राची कात्रणे त्यांनी पुरावा म्हणून सादर केली आहेत. व याचा खुलासा मुख्यमंत्री महोदय करतील का अशी पुस्तिही त्यांनी जोडली आहे.



Be First to Comment