

पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण शहराच्या हद्दीत असणाऱ्या सर्वे नंबर ४९५ या जागेवर गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाचे विश्वास कानू वाघ यांच्या कुटुंबांचे वास्तव्य असून त्या जागेवर त्यांचे घर बांधलेले आहे व सदर शिल्लक असणा-या शासनाच्या जागेवर पूर्वपारपासून ताबेकब्जा असल्याने त्या जागेसाठी त्यांनी शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू केला आहे.परंतु ही जागा विश्वास वाघ यांना मिळू नये याकरिता येथील माहिती अधिकारातील कार्यकर्ता अमोद मुंडे व नागेश सुर्वे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून नाहक त्रास देण्याचे ठरविल्याने त्यांच्या विरोधात विश्वास वाघ यांने आदिवासी समाजाचा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले आहे.
याबाबतची माहिती देताना विश्वास वाघ यांनी सांगितले की शहराच्या उत्कर्ष नगर भागात असणाऱ्या सर्वे नंबर ४९५ या जागेच्या दोन गुंठे मध्ये आमचे घर असून लगत असणाऱ्या शासनाच्या शिल्लक जागेवर आमचे पुर्वीपारपासून ताबेकब्जा आहे.त्यामुळे त्या उर्वरित जागेकरिता शासन स्तरावर आमचे पत्र व्यवहार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असून जागेचे शासनाकडे पैसे सुद्धा मी भरलेले आहे असे असताना ती जागा मला मिळू नये याकरिता येथील माहिती अधिकारातील कार्यकर्ता आमोद मुंडे व नागेश सुर्वे यांनी माहिती अधिकाराखाली वारंवार शासनाकडे माहिती मागून माझे घर तोडणे व जागा सोडण्याबाबत गेली नऊ वर्ष मला त्रास देत आहेत माझे त्यांच्याबरोबर कोणतेही वैर नसून तो आमच्या आदिवासींचा एवढा का द्वेष करत आहे यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून याकरीता आम्हाला नाहक त्रास देणाऱ्या अमोल मुंडे व त्याच्या साथीदारावर कारवाई करण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.जर येत्या पंधरा दिवसात मला योग्य न्याय मिळाला नाही तर आदिवासी समाज संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करेल.
पेण हद्दीतील ही जागा महाराष्ट्र शासनाची असून त्यावरील दोन गुंठ्यावर विश्वास वाघ याचे घर आहे मात्र उर्वरित १२ गुंठे जागा ही शासनाची असल्याने ती जागा आदिवासी भवनासाठी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यूपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच बेघर आदिवासींच्या घरांसाठी देण्यात यावी यासाठी शासनाकडे आम्ही मागणी केली आहे आमचा कोणताही उद्देश त्यांचा घर तोडावा किंवा जागा बळकविण्याचा नाही.
अमोद मुंडे, नागेश सुर्वे – माहिती अधिकार कार्यकर्ता पेण



Be First to Comment