
३४ व्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तन्मय पाटील याला ब्राँझ पदक
बेलवडे गावाचे नाव केले उज्वल
पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील बेलवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहन रामशेठ पाटील यांचा मुलगा तन्मय पाटील याने फरीदाबाद (हरियाणा) येथे झालेल्या ३४ व्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ च्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ब्राँझ पदक पटकावून तिसरा क्रमांक मिळविल्याने त्याची कॅनडा येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे.
तन्मय पाटील याला लहानपणापासूनच पॉवरलिफ्टिंग ची आवड असून आजवर त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेत पारितोषिक मिळवली आहेत त्याच्या या यशाबद्दल बेलवडे गावासह तालुक्याचे नाव उज्वल झाले असून तन्मय पाटील याच्या यशाबद्दल राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रितम पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक अभिराज कडू, प्रसिद्ध उद्योजक प्रविण प्रतापराव भोसले, मंगेश दळवी, सचिन डाबी, सरपंच हरीश पाटील, भाजप युवा जिल्हा चिटणीस प्रवीण पाटील, माजी उपसभापती बाळाराम पाटील, पोलीस पाटील किसन पाटील, खोपोली नगर परिषदचे माजी नगरसेवक काशिनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील आदिंसह गावातील ग्रामस्थ महिला मंडळांनी त्याचे अभिनंदन केले आहे.



Be First to Comment