Press "Enter" to skip to content

पत्रकार दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन

शहर विकासात जनतेच्या अपेक्षांवर होणार मंथन, शहर विकासात सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या अपेक्षा ; शहर विकासात जनतेच्या अपेक्षांवर होणार जागर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई प्रेस क्लब व नवी मुंबई यनियन ऑफ जर्नालिस्टस् यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त मंगळवार, ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहर विकासात सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या अपेक्षा या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

जागर लोकशाहीचा, उत्सव निवडणुकीचा अभिमान नवी मुंबईचा या संकल्पनेवर आधारित हा परिसंवाद मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होणार आहे.
या परिसंवादात विविध क्षेत्रांतील मान्यवर वत्ते आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये नवी मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. संजय पत्तीवार सेवानिवृत्त शहर अभियंता डॉ. मोहन डगांवकर, माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर, बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष तथा विश्वस्त देवांग त्रिवेदी, स्त्रीमुक्ती संघटना तसेच नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम, सा.आजची नवी मुंबईचे संपादक संजयकुमार सुर्वे यांचा समावेश आहे.

नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य नागरिकांना नेमके काय हवे आहे आणि महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत, यावर अनुभवी व तज्ञ वक्ते आपले विचार मांडणार आहेत. मतदार राजा ठेव कर्तव्याचे भान, सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान हा संदेश देत, नवी मुंबईकर नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मतदारांनी मोठÎा संख्येने या परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.